आळते येथे मोटरसायकलच्या धडकेत एक ठार

आळते / प्रतिनिधी

आळते येथे मोटरसायकलच्या धडकेत ६५ वर्षीय वृध्द ठार झाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे. या घटनेत विजय पारीसा कनवाडे (मुळ गाव आळते, सध्या रा. जवाहरनगर, इचलकरंजी) असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.

याबाबत पोलीसांतून मिळालेली माहिती अशी, आळते येथे विजय कनवाडे हे शनिवारी दुपारच्या सुमारास शेतीच्या कामासाठी आले होते. त्यावेळी ते हातकणंगले-वडगाव येथील मदरसा येथील बस थांब्यावर जाण्यासाठी पायी निघाले होते. याच दरम्यान हातकणंगलेहून वडगावच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या मोटरसायकल (एमएच ०९ जीआर १४७०) ने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात सदर मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे.

Scroll to Top