हातकणंगले / प्रतिनिधी
येथील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी गणेश विलास वाईकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे . बुधवार ता. २३ अखेर २९ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत . त्यामध्ये प्रामुख्याने डॉ. सुजित मिणचेकर , अशोकराव माने, अविनाश बनगे , भास्कर शेटे, वैभव कांबळे, अजित देवमोरे यांचा समावेश आहे . अनेक इच्छुक उमेदवार गुरुवार ता २४ रोजी गुरुपुष्यामृताचा योग साधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.