वटपौर्णिमेनिमित्त श्री रुक्मिणीमातेस अलंकार परिधान

पंढरपूर / प्रतिनिधी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नेहमीच सणावाराला विठ्ठल व रुक्मिणी मातेला अलंकाराचे पोशाख केले जातात. वटपौर्णिमा असल्याने रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महिलांची गर्दी झाली होती. यावेळी रुक्मिणी मातेस विशेष अलंकार साज असा पेहराव करण्यात आला.
मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज क्षत्रीय यांनी सांगितले की, वटपौर्णिमेनिमित्त श्री रूक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले होते. त्यामध्ये सोने मुकूट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकाराचा समावेश आहे. अलंकारामुळे रुक्मिणी मातेचे रूप मनमोहक दिसत होते.

Scroll to Top