महाराष्ट्र दिनानिमित्त कागल पं.स. समोर ध्वजारोहण

कागल / प्रतिनिधी

महाराष्ट्र दिनानिमित्त कागल पंचायत समिती कार्यालयासमोरील ध्वजारोहण प्रशासक कुलदीप बोंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोंगे यांच्या हस्ते कार्यालयासमोरील हुतात्मा स्मारकाचे पूजनदेखील करण्यात आले.
यावेळी आरोग्य अधिकारी फारूक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या आजारांचे प्रात्यक्षिक करून प्रशिक्षण देण्यात आले. सहायक गट विकास अधिकारी प्रमोद तारळकर, बिहार पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता, प्रभारी गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Scroll to Top