उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवकार्य सदस्य नोंदणीला प्रारंभ

इचलकरंजी / प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ६१ वा वाढदिवस इचलकरंजी शहर शिवसेनेच्यावतीने विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने येथील म हात्मा गांधी पुतळ्या नजीक शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखाली आणि शहर प्रमुख भाऊसाहेब आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर विविध उपक्रम राबवण्यात आले.
सकाळी येथील मारुती मंदिरात अभिषेक घालून एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य लाभू दे, अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी नागरिकांना लाडू आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यानंतर शिवसेनेच्या शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभकरण्यात आला. या सदस्य नोंदणीला शहरातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये सुमारे ५० हजार सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे जिल्हाप्रमुख माने यांनी यावेळी स्पष्ट केले. तर शहरातील प्रत्येक भागात शिवसैनिक सदस्यांची नोंदणी करण्यासाठी अभियान राबवण्यात येणार असल्याचे शहर प्रमुख भाऊसाहेब आवळे यांनी सांगितले.
या उपक्रमावेळी महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख वैशालीताई डोंगरे, युवती सेना जिल्हाप्रमुख सलोनीताई शिंत्रे, माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, इकबाल कलावंत, माजी आरोग्य सभापती रविंद्र लोहार, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, उपशहरप्रमुख सुशील खैरमोडे, जिल्हा संघटक मोहन मालवणकर, ऋषी गौड, संदीप माने, महिला आघाडी शहरप्रमुख स्नेहांकिता भंडारे, शहरप्रमुख रुपालीताई चव्हाण, उपशहरप्रमुख दिपाताई देसाई, मिनाताई भिसे दिप्ती भोकरे, रेखाताई बिरंजे, विभागप्रमुख शंकुतला पाटील, विद्याताई जाधव, सोनाली आडेकर, वैशाली शिंदे, सरिता पांडव, शितल जाधव, शिवाजी जगताप, महेश ठोके, विलासकाका माने, विनायक काळे, संताजी जाधव, हेमंत कांबळे, रमेश काळे, दीपक जगताप, राजू लायकर, विनायक सूर्यवंशी, अमित शिरगुरे, लखन कांबळे, ऋतुराज शिंत्रे, ओंकार घोरपडे आदी नागरिक उपस्थित होते.

Scroll to Top