पोर्ले /प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये पोर्ले, (ता.पन्हाळा) गावातील विद्यार्थ्यांनी यश संपादित केले, यामध्ये कर सहाय्यक तसेच महसूल सहाय्यकपदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पोर्ले येथील शाखेच्या वतीने या सत्कार करण्यात आला.
पोर्ले ग्रामपंचायत अभ्यासिके मध्ये जिल्हाप्रमुख संजय चौगुले, उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, तालुकाप्रमुख बाबासाहेब पाटील, लोकनियुक्त सरपंच रंजना गुरव, महिला आघाडी तालुकाप्रमुख चंद्रभागा चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्कार समारंभ संपन्न झाला.
सदर परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये चित्रा पाटील यांची कर सहाय्यक तसेच महसूल सहाय्यक अशा दोन्ही विभागामध्ये यश संपादित केले आहे. विशाल धनगर, हर्षद सावंत, शुभम खवरे, संजीवनी चौगुले व वासंती जाधव यांनी महसूल सहाय्यक विभागांमध्ये यश संपादित केले.
या सत्कार समारंभामध्ये बोलताना, जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी सर्व यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पोर्ले गावाबरोबरच तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव कशाप्रकारे उंचावेल याकडे अधिक लक्ष देऊन त्यांच्या विभागांमध्ये येणाऱ्या नागरिकांची कामे तत्काळ मार्गी लावावीत व भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण या विद्यार्थ्यांना आल्यास त्यांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठामपणे उभ्या असल्याचे सांगितले.
या सत्कार समारंभ कार्यक्रमास महिला आघाडी उपतालुका प्रमुख माया चौगुले, दीपक चौगुले, युवासेना उपतालुकाप्रमुख संतोष व्हरांबळे, शाखाप्रमुख अक्षय चौगुले, युवासेना शाखाप्रमुख विशाल भोपळे, एम. पी चौगुले सर, पं.समिती मा.सभापती संजय चावरेकर, नंदकुमार गुरव, चंद्रकांत चौगुले, लक्ष्मण सिद तसेच इतर ग्रामस्थ, पदाधिकारी, शिवसैनिक आणि अभ्यासिकेमधील इतर विद्यार्थी उपस्थित होते.
