नृसिंहवाडी / प्रतिनिधी
येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी चेतन चंद्रकांत गवळी यांची बिनविरोध निवड झाली. चित्रा सुतार यांनी रोटेशननुसार राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले होते. त्यामुळे सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलावण्यात आली होती. चेतन गवळी यांचा एकच अर्ज असल्याने त्यांची निवड झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी तथा मंडळ अधिकारी अमितकुमार पडळकर यांनी केली.
गवळी म्हणाले, नृसिंहवाडी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी यापुढे जोमाने काम करणार आहे. कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यास जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत. यावेळी माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, उपसरपंच रमेश मोरे, अनंत धनवडे, मुरलीधर गवळी, अनघा पुजारी, पूनम जाधव, विद्या कांबळे, मंगल खोत, तानाजी निकम, रमेश सुतार, सागर धनवडे, रमेश खिरूगडे, बाळासाहेब कुन्नुरे, प्रतीक धनवडे, सागर आणुजे, दत्तात्रय मोरबाळे, उत्तम पोवार, सनी माने, गणेश सुतार आदी उपस्थित होते.

