निपाणी / प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, आंदोलन नगर निपाणी सेवा संस्थान यांच्या वतीने स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन केले आहे .
शनिवार ता. २९ रोजी सकाळी ठिक ८ वा श्री स्वामी चरित्र सारामृत या पोधीचे पारायण होईल. रविवार ता.३० रोजी दुपारी ४ वा पालखी सोहळा व शोभा यात्रा होईल. सोमवार ता. ३१ रोजी १२.०० वा. महाप्रसाद व भजन सेवेचे आयोजन केले आहे. ज्या भक्तांना अन्नदानासाठी शिधा द्यावयाचा असेल, त्यांनी मंदिरामध्ये संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
