निपाणीत श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा उत्साहात

निपाणी / प्रतिनिधी

आंदोलन नगर येथील स्वामी समर्थ मंदिरतर्फे रविवारी प्रकट दिनाच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा व शोभायात्रा उत्साहात झाली. हलगी, घुमके, कैताळसह वारकरी सांप्रदायाच्या उपस्थितीत तब्बल चार तास शोभायात्रा चालली.
सायंकाळी ५.३० वाजता राम मंदिर येथे पालखीचे पूजन व उद्योजक प्रवीणभाई शाह यांच्या हस्ते आरती झाली. दरम्यान, सोमवारी ३१ रोजी मंदिरात प्रकट दिन साजरा होणार असून दुपारी १२ नंतर महाप्रसाद वाटप होईल.
रविवारी सायंकाळी शहराच्या मध्यवर्ती भागातील श्रीराम मंदिरपासून पालखी व शोभायात्रा जुना मोटर स्टॅन्ड, कोठीवीले कॉर्नर, चन्नमा सर्कल, जुना पी. बी. रोड, जीव हॉस्पिटल, आंबा मार्केट तेथून नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर रात्री ९ वा. मंदिरामध्ये आल्यानंतर महाआरती झाली.
वा. दरम्यान, सोमवारी सकाळी ६ अवधूत सामानगडकर, (चिखली) व पुजारी सुरेश संकपाळ यांच्या अधिपत्याखाली महाअभिषेक व पूजा होणार असून त्यानंतर महाआरती होणार आहे.

Scroll to Top