वृत्तपत्र विक्रेता चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून

कोल्हापूर / प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राजारामपुरी वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे शास्त्रीनगर येथील मैदानावर गुरुवार, दि. २० व शुक्रवार, दि. २१ फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत कोल्हापूर व सांगली येथील संघ सहभागी झाले आहेत.
स्पर्धेत राजारामपुरी डेपो, भाऊसिंगजी डेपो, मराठा बँक डेपो, कावळानाका डेपो, संभाजीनगर डेपो आणि सांगली डेपो या संघांनी सहभाग नोंदविला आहे.
दरम्यान, स्पर्धेच्या चषकाचे अनावरण नुकतेच झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष किरण व्हनगुत्ते, अंकुश परब, सुरेश ब्रम्हपुरे, शहर संघटनेचे अध्यक्ष रवि लाड, संघटक शंकर चेचर, उपाध्यक्ष रणजित आयरेकर, कार्याध्यक्ष सुरेंद्र चौगुले, राजारामपुरी संघटनेचे अध्यक्ष आसिफ मुल्लानी, संघटक रमेश जाधव, ग्रामीण उपाध्यक्ष संदीप ब्रम्हदंडे, स्पर्धा समिती प्रमुख सौरभलाड, तंझिल अन्सारी आदी उपस्थित होते.

Scroll to Top