ऊस परिषदेसाठी नेटके नियोजन

२५ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे आयोजन

जयसिंगपूर/प्रतिनिधी

शुक्रवार २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता २३ वी ऊस परिषद विक्रमसिंह मैदान, जयसिंगपूर येथे होत आहे. यासाठीचे नेटके नियोजन झाले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या महिला नेत्या सौ. शुभांगी राम शिंदे यांनी दिली आहे.

बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील शेतकरी ऊस परिषदेला गेली २२ वर्षे मोठ्या संख्येने येतात. गेल्या वर्षीचे आंदोलन विक्रमी दिवस चालले होते. मागितल्या प्रमाणे दरही मिळत चालले आहेत. त्यामुळे यंदाची ऊस परिषद विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरची मोठी गाजणार आहे. कारण, येथे मागण्यात येणारा दर साखर सम्राटांनी जाहिर केला नाही तर विधानसभा निवडणुकीत नुकसान होऊ शकेल, अशा अर्थाची सध्याची चर्चा आहे.

Scroll to Top