कोल्हापूर / प्रतिनिधी
कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये सोमवार (दि. १०) रोजी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता उच्च शिक्षणातील बदल आणि नवनिर्मिती बहुविद्याशाखीय दृष्टिकोन’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
परिसंवादाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते होणार आहे. डॉ. होमी भाभा विद्यापीठ, मुंबईचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत बीजभाषण करणार आहेत. कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम अध्यक्षस्थानी असतील.
यावेळी प्र कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सदस्य ॲड. अमित बाडकर, ॲड वैभव पेडणेकर, उद्योजक आर्य देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. परिसंवादात डॉ. महेश शिंदे, डॉ. कबीर खराडे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय – परिसंवादात सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी यांनी केले आहे.
