कोल्हापूर /प्रतिनिधी
ऑल इंडिया फेडरेशन ऑफ
एलिमेंटरी टीचर्स ऑर्गनायझेशनची सातवी राष्ट्रीय कॉन्फरन्स येथे १ व २ फेब्रुवारीला मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवनमध्ये होत असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
परिषदेत ‘भारतीय संविधान आणि नवीन शैक्षणिक धोरण,’ देशभरातील शिक्षकांचे ज्वलंत प्रश्न, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण कायदा व त्याचा प्रभाव, शासनाचे शाळा बंद पाडण्याचे धोरण, जागतिकीकरण यांवर चर्चा होईल. आमदार प्रवीण स्वामी, जयंत आसगावकर, रामदास मेश्राम, डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. २ फेब्रुवारीला सकाळी ११:३० वाजता अधिवेशन होणार आहे. पत्रकार परिषदेस सुधाकर सावंत, उमेश देसाई, राजेंद्र पाटील, प्रमोद तौंदकर, संजय पाटील, संजय कडगावे, ज्योतीराम पाटील, अर्जुन पाटील, उत्तम गुरव, आदी उपस्थित होते.