मजले/प्रतिनिधी
हातकणंगले तहसिल कार्यालयामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . ग्राहक दिनाचे आयोजन अखिल भारतीय ग्राहक पंचायत या संस्थेने केले होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार संदीप चव्हाण होते .
कार्यक्रमामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे हातकणंगले तालुकाध्यक्ष ॲडवोकेट ओंकार देवकाते यांनी सायबर क्राईम , ई-कॉमर्स व डिजिटल ट्रेड या विषयावर मार्गदर्शन केले . तर मेडिएटर ॲडव्होकेट दत्तात्रय देवकाते यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा गेल्या पन्नास वर्षाच्या कार्याचा आढावा घेत संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात ग्राहकांनी सजग राहण्याचे आव्हान केले . कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात ग्राहक उपस्थित होते . कार्यक्रमाचे आभार पुरवठा अधिकारी चंद्रकांत काळगे यांनी मानले. यावेळी महसूल सहाय्यक सुनिता दिवटे यांचे सहकार्य लाभले.