एकसंबा/ प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र
सध्याच्या मोबाईल युगात बालकांमध्ये पारंपरिक खेळाचा विसर पडत असून अनेक खेळ केवळ चित्रात दिसण्यायोग्य बनल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे पारंपरिक खेळ आणि संस्कृतीचा जागर करण्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या मलिकवाड येथील वीर सेवा दल, जैन मंदिर कमिटीतर्फे आयोजित १५ वर्षाखालील बुद्धीबळ स्पर्धेत नांदणीच्या संस्कृती मनोजकुमार सुतार हिने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकाविले.
सकाळपासून सायंकाळी ५ वा. पर्यंत ७ फेऱ्यांमध्ये स्पर्धा रंगतदार झाली. स्पर्धेत १३० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
यामध्ये संस्कृती सुतार (नांदणी), प्रेम निचेल (सेनापती कापशी), अथर्व तावरे (इचलकरंजी) यांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविला. तर अथर्व सुतार, अर्णव राजू परळेकर, प्रथमेश व्यापारी, प्रज्वल करडे, महात डॅनिश, ओम संदीप संकपाळ, श्रद्धा प्रकाश करडे, सचिन सुरेश पुजारी, रणवीर ताकाई, सिद्धेश विनायक वडे, अर्हम अनुप शहा, भूमिका सुरेश तारदाळे यांनी चतुर्थ ते पंधराव्या क्रमांकाचे बक्षीस पटकाविले. यावेळी मंदिर कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, रावसाहेब कुन्नुरे, संतोष पाटील, अजित उपाध्ये, राजेंद्र केरुरे, मिलिंद देशपांडे, अजित सुतार, दर्शन पंडित उपस्थित होते.
