कोल्हापूर / प्रतिनिधी
अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमधील नमन योगानंद फुलारी याने डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत राज्यपातळीवर सुवर्णपदक पटकावले. तो इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. मुंबईतील सायन्स टीचर्स असोसिएशनने (एम.एस.टी.ए.) परीक्षा आयोजित केली होती.
नमन फुलारी याने चारही सत्रांत यश मिळवून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वैद्यकीय क्षेत्रात वापर या विषयावर आपला प्रकल्प सादर केला. परीक्षेत देशभरातील ७५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
नमन फुलारी याला संस्थेचे चेअरमन संजय घोडावत, सर्व शिक्षक, डॉ. योगानंद फुलारी, डॉ. भावना फुलारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

