ना.बा.बालमंदिरचे स्नेहसंमेलन उत्साहात

इचलकरंजी/ प्रतिनिधी

श्री. ना. बा. एज्युकेशन सोसायटीच्या श्री.ना.बा. बालमंदिर व विद्यामंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा हे होते. तर प्रमुख पाहुणे शिक्षण मंडळाचे माजी शिक्षण सभापती राजू बोंद्रे उपस्थित होते.
संस्थेचे चेअरमन कृष्णाजी बोहरा, संस्थेचे विश्वस्त मारुतराव निमणकर, अहमदभाई मुजावर, स्कूल कमिटी चेअरमन श्रीकांत चंगेडिया उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी शाळेच्या कामाचे कौतूक केले. तसेच श्रीनिवास बोहरा यांनी सर्वसामान्यांची मुले आपल्या शाळेत शिकली पाहिजेत, असे सांगितले. यावेळी बालवाडी ते ४ थीच्या मुलांनी लोकगीतावर आधारित नृत्यातून आपली कला सादर केली. पुरस्कारप्राप्त शिक्षक, बाह्य स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी व आदर्श विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक सौ. जयश्री पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अमर महाजन यांनी तर अहवाल वाचन मुख्याध्यापिका सौ. शारदा भगत यांनी केले. सूत्रसंचालन सौ. रेखा गायकवाड यांनी केले. आभार सौ. गायत्री पोवार यांनी मानले. यादी वाचन आनंद कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाला निशा दंडगे, संतोष कारंडे, मुकुंद चव्हाण, प्रशांत गावीत, अशोक जाडर, सौ. संगिता सटाले, सौ. आश्विनी साळुंखे, सौ. सरला डावरे, सौ. आक्काताई चिंचवाडे, श्रीम. शैलजा कोरे, सौ. शोभा कुंभार, सौ. अर्चना पांगिरे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होते.

 

Scroll to Top