इचलकरंजी / प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र
महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे गुरुवारपासून रजेवर गेले आहेत. रजेच्या मुदतीत त्यांचा कार्यभार अति. आयुक्त सुषमा शिंदे यांच्याकडे राहणार आहे.
गेल्या दीड वर्षापासून आयुक्त दिवटे महापालिकेत कार्यरत असून, नुकताच त्यांच्या प्रशासक पदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे आला आहे. सोपवण्यात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बदलीचे संकेत मिळत होते. त्यांनी बदलीच्या अनुषंगाने मॅटमध्ये केलेला दावा मागे घेतल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. त्यातच ते गुरुवारी रजेवर गेल्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चा आहे. आयुक्त दिवटे पूर्ववत रुजू होणार की, त्यांच्या जागी नवीन आयुक्त येणार याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
