
जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढत आहे. रविवारी किमान तापमान १६ अंशांवर आल्याने हुडहुडी अधिकच जाणत होती. मंगळवार (दि.१७) पर्यंत थंडीची – तीव्रता कायम राहण्याचा अंदाज असून, शुक्रवार (दि. २०) पासून पुन्हा किमान तापमान वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानात घसरण सुरू आहे. यामुळे, शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात थंडीचा कडाका चांगलाच
वाढला आहे. रविवारी हवेत दिवसभर गारठा जाणवत होता. सायंकाळनंतर थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. थंडी वाढल्याने सायंकाळनंतर शहरी भागासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या होत्या. लोक घराबाहेर पडताना स्वेटर, जॅकेट, कानटोपी परिधान केलेले दिसत होते.
कोल्हापुरात रविवारी किमान तापमान १६.३ अंशांवर होते, तर कमाल तापमान २९.२ अंशांवर होते. सायंकाळनंतर बोचऱ्या वाऱ्यामुळे प्रत्यक्ष किमान तापमानापेक्षा एक अंश कमी होते.
