बेसिक लाईफ सपोर्ट संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना निवेदन

इचलकरंजी / प्रतिनिधी

बेसिक लाईफ सपोर्ट (जीवन संजीवनी) चा महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात जसे नर्सिंग शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, शाळा व कॉलेजच्या सर्व विभागात अनिवार्य करण्यात यावा यासाठीचा खलिता अलायन्स हॉस्पिटल तर्फे महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आला.
आजच्या वाढत्या धगधगीच्या काळात हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेले आहे, हार्ट अटॅक आल्यानंतर पेशंट आपण घरातून हॉस्पिटल पर्यंत घेऊन जाईपर्यंत मरण पावतात , असे पेशंट आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यापूर्वी सुद्धा वाचवू शकतो यासाठीचे ट्रेनिंग म्हणजे बेसिक लाईफ सपोर्ट (जीवन संजीवनी) अलायन्स हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. बाळकृष्ण कित्तुरे, सर्व डायरेक्टर व सी ईओ आयेशा राऊत व सर्व इचलकरंजीवासीय यांच्यातर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बेसिक लाईफ सपोर्ट (जीवन संजीवनी) याचा महाराष्ट्राच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करून घेण्यासाठीचा खलिता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला.

Scroll to Top