७ मे दिनविशेष २०२५

 मे दिनविशेष २०२५

१८४९: जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथुन यांनी कलकत्ता फिमेल स्कूल सुरू केले.

१९०७: मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली.

१९४६: सोनी ह्या कंपनी ची स्थापना झाली.

१९५५: एअर इंडिया ची मुंबई – टोकियो विमानसेवा सुरू झाली.

१९७६: होंडा एकॉर्डा या गाडी प्रकाशित करण्यात आली.

१९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.

१९९२: एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.

१९९८: मर्सिडीज-बेंज कंपनी ने क्रिस्लर हि कंपनी ४० अब्ज अमेरिकन डॉलर्स मध्ये विकत घेतली ही इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक विलीनीकरण आहे.

२०००: व्लादिमीर पुतिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले.

२०००: कोची येथे झलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिरुअनंतपुरमचा नऊ वर्षाचा बुद्धिबळपटू अर्जुन विष्णुवर्धन याला भारतातील सर्वात लहान फिडे मास्टर होण्याचा मान मिळाला.

१८६१: पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रबिंद्रनाथ ठाकूर तथा टागोर यांचा कलकत्ता येथे पिराली ब्राम्हण कुटुंबात जन्म. (मृत्यू: ७ ऑगस्ट १९४१)

१८८०: भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १९७२)

१८९२: क्रांतिकारक आणि युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचा जन्म. (मृत्यू: ४ मे १९८०)

१९०९: पोलरॉइड कॉर्पोरेशनचे संस्थापक एडविन एच. भूमी यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९९१)

१९१२: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार पन्नालाल पटेल यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल १९८९ – अहमदाबाद, गुजरात)

१९२३: मराठी नाट्यअभिनेते व दिग्दर्शक आत्माराम गोविंद भेंडे यांचा आरोंदा (सिंधुदुर्ग) येथे जन्म.

१९४८: मैहर घराण्याचे बासरी वादक नित्यानंद हळदीपूर यांचा जन्म.

१९६७: भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार राम नरेश रावत यांचा जन्म (मृत्यू : ४ सप्टेंबर २०२२)

१९४९: भारतीय वकील आणि राजकारणी गोपाल निमाजी वाहनवती यंचा जन्म (मृत्यू : २ सप्टेंबर २०१४)

१९३२: लेफ्टनंट जनरल – महावीरचक्र, परम विशिष्ट सेवा पदक राज मोहन वोहरा याचा जन्म (मृत्यू : १४ जून २०२०)

१९२४: भारतीय कार्यकर्ते अलायरी सीताराम राजू यांचे निधन.

१९९१: लोककवी मनमोहन उर्फ गोपाल नरहर नातू यांचे पुणे येथे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९११)

१९९४: ध्रुपद गायक उस्ताद नसीर झहिरुद्दिन डागर यांचे निधन.

२००१: लेखिका मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९०५)

२००१: गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन यांचे निधन. (जन्म: १३ जून १९२३ – अंबाला, पंजाब)

२००२: मराठी अस्मितेच्या व विचार स्वातंत्र्याच्या बुलंद पुरस्कर्त्या, जेष्ठ लेखिका, तत्त्ववेत्या आणि निसर्गाच्या अभ्यासक दुर्गाबाई भागवत यांचे मुंबई येथे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १९१०)

२०२२: पश्चिम बंगालचे वक्तृत्वकार पार्थ घोष यांचे निधन

२०११: कॅनेडियन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार विलार्ड बॉयल यांचे निधन (जन्म: १९ ऑगस्ट १९२४)

१९९८: दक्षिण आफ्रिकन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक ऍलन मॅक्लिओड कॉर्मॅक यांचे निधन (जन्म: २३ फेब्रुवारी १९२४)

१९९१: लोककवी गोपाळ नरहर तथा मनमोहन नातू यांचे निधन (जन्म: ११ नोव्हेंबर १९११)

१९८७: अमेरिकन सैनिक आणि कार्यकर्ता, गे मेन्स हेल्थ क्रायसिसचे सहसंस्थापक पॉल पोफम यांचे निधन (जन्म: ६ ऑक्टोबर १९४१)

Scroll to Top