मनपाडळे हायस्कूल मनपाडळे मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

मनपाडळे / प्रतिनिधी
मनपाड‌ळे हायस्कूल मनपाडळे मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला ध्वजपूजन व ध्वजारोहण संस्थेचे संचालक श्री. वाय. बी.पाटील यांनी केले. यावेळी विदयार्थ्यांनी राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीत सादर करून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी कु. प्रतिक्षा वाघमारे, अनुष्का वाघमारे, तन्मय वाघमारे, ओंकार सूर्यवंशी, गणेश शिंदे या विदयार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विदयालयाचे मुख्याध्यापक श्री. अरुणसिंह पाटील सर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध स्पर्धेचे पुरस्कार वितरण करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
सूत्रसंचालन सौ. गुजर एस. जी व आभार प्रदर्शन श्रीमती वंदना पाटील यांनी केले

Scroll to Top