केरळच्या मंदिरात भडकलेल्‍या हत्तीने माहूताला चिरडून केलं ठार, दुकानांचेही माेठे नुकसान

केरळच्या पालक्काडच्या कुट्टनाड परिसरात एका हत्तीने अचानक लोकांवर हल्‍ला केला. या हल्‍ल्‍यात हत्तीचा महावत कुंजुमोनचा मृत्‍यू झाला. पालक्‍काडच्या कुट्टनाड मध्ये एका मंदिरात वार्षिक उत्‍सवाचे आयोजन करण्यात आले होते. गुरूवारी रात्री साधारण १० वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास एक सजवलेला हत्‍ती अचानक भडकला. हत्‍तीचा महावत कुंजू मोनने हत्तीला शांत करण्याचा प्रयत्‍न केला मात्र त्‍याला त्‍यात यश आले नाही.

इतक्‍यावरच हत्ती थांबला नाही तर त्‍याने परिसरातील दुकानांचीही मोड-तोड करून मोठे नुकसान केले. यामुळे या परिसरात काहीकाळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या आधीही अशाप्रकारे धार्मिक कार्यक्रमा दरम्‍यान हत्ती भडकल्‍याने लोकांचे जीव गेल्‍याच्या घटना घडल्‍या आहेत.
केरळच्या पालक्‍काड मध्ये कुट्टनाड परिसरात अचानक एक हत्ती भडकला. त्‍याने उपस्‍थितांवर हल्ला करण्यास सुरूवात केली. यावेळी हत्तीला नियंत्रित करण्याचा प्रयत्‍न करणाऱ्या महाहुताचाही दुदैवाने जीव गेला. पालक्‍काडच्या कुट्टनाड मध्ये एका मंदिरात धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गुरूवारी रात्री या कार्यक्रमात सहभागी हत्ती अचानक भडकला. यामध्ये महावताचा मृत्‍यू झाला.
मात्र बऱ्याच प्रयत्‍नानंतर या हत्तीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, गुन्हा दाखल करत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Scroll to Top