कोल्हापूर येथे अंबाबाई मंदिराजवळ संत गाडगे महाराज पुतळ्यासमोर असलेल्या महावितरणच्या डीपीला सोमवारी (दि. १६) रात्री दहाच्या सुमारास आग लागली. हा प्रकार लक्षात येताच याच परिसरातील रहिवासी असलेले अग्निशामक दलाचे जवान मेहबूब जमादार यांनी वाळू टाकून आग नियंत्रणात आणली. महापालिकेतील अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून १५ ते २० मिनिटांत आग विझवली. जमादार यांच्यासह चालक योगेश जाधव, फायरमन उदय शिंदे, संग्राम पाटील यांनी आग विझवण्याचे काम केले.