उचगाव / प्रतिनिधी
‘महावीर भगवान की जय’, ‘अहिंसा परमो धर्म की जय’, ‘आज की आनंद की जय’, ‘चंद्रप्रभू भगवान की जय’च्या जयघोषात उचगाव येथील दिगंबर १००८ चंद्रप्रभू जैन समाजाच्या वतीने महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
गावातून सवाद्य जैन श्रावक -श्राविकांच्या वतीने भगवान महावीरांच्या मूर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. णमोकार मंत्राच्या घोषाने सारा परिसर दुमदुमून गेला. डोक्यावर कलश घेऊन जैन महिला श्रावक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
जैन मंदिरात सकाळी अभिषेक, अर्चा जलाभिषेक, पूजा दुग्धाभिषेकसह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. तसेच पूजेचे भगवान महावीरांच्या पाळण्याच्या दोरीचे सवाल काढण्यात आले. ‘चिंतामणी पार्श्वनाथ’ तालावर मंदिरासमोर महिलांनी संगीत नृत्य करत भगवान महावीरांची आरती केली. यावेळी जैन महिला मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

