हुपरीचा श्रेयस गाठ ठरला महाराष्ट्र केसरी

हुपरी/ प्रतिनिधी

अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील गादी विभागातील ९२ किलो वजनीगटातील सलग पाच फेऱ्या जिंकून ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचा बहुमान रौप्यनगरी हुपरी (ता. हातकणंगले) येथील श्रेयस राहुल गाट याने पटकाविला. पुणे, नाशिक, धुळे व अहिल्यानगरमधील प्रतिस्पर्ध्याना धूळ चारत त्याने हे यश खेचून आणले. स्पर्धेच्या पाचव्या अंतिम फेरीत त्यांने पुण्याच्या अभिजित गुंजाळ या प्रतिस्पर्धी मल्लाशी कडवी झुंज देऊन त्याला अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाट यांचा नातू श्रेयसने कुस्तीचे प्राथमिक धडे वस्ताद वडील राहुल यांच्या तालमीत गिरविण्यास सुरुवात केली.

Scroll to Top