इचलकरंजी /प्रतिनिधी
इचलकरंजी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मदन कारंडे यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे मदन कारंडे यांनी नियोजनबद्ध प्रचार सुरू केला आहे.
प्रत्येक प्रभागात गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. रोज दोन ते तीन प्रभागांमध्ये घरोघरी जाऊन ते गातीभेटी घेत आहेत. तसेच कार्यकर्ते देखील प्रत्येक घरामध्ये पत्रक पोहोचवत आहेत. एक सुशिक्षित व सभ्य नेतृत्व म्हणून इचलकरंजी मध्ये मदन कारंडे यांची ओळख आहे. महायुती समोरील तगडे आव्हान असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात आहे.