क्षयमुक्त कोल्हापूरसाठी प्रयत्न करूया उपायुक्त पंडित पाटील यांचे आवाहन

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर शहर क्षयमुक्त करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करूया, असे आवाहन उपायुक्त पंडित पाटील यांनी केले. क्षयरोग विभागाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांच्या उपस्थितीत कार्यशाळा झाली.
आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी कार्यशाळेचा उद्देश विषद करून महानगरपालिकेद्वारे क्षयरोगाचे निदान आणि उपचार तसेच इतर सर्व मोफत सुविधा पुरविण्यात येतात. परंतु गरजू लोकांना याची माहिती मिळणे आवश्यक आहे. याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे, असे सांगितले.
डॉ. रुपाली दळवी यांनी प्रेझेंटेशनद्वारे क्षयरोगाला घाबरू नका.वेळीच उपचार केल्यास क्षयरुग्ण ठणठणीत बरा होतो. तसेच क्षयरोगाचा प्रसारही रोखता येतो, असे सांगितले. डॉ. अमरसिंह पोवार यांनी १०० दिवसीय क्षयरोग मोहिमेमध्ये ४४४ नव्या रुग्णांचा शोध घेतला असून त्यांच्यावर आता उपचार सुरू असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. अमोलकुमार माने, मोहन सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Scroll to Top