कोल्हापूर / प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील पाटपन्हाळा येथे शिवाजी विद्यापीठ विधी विभागातर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
येथील चतुर्भुज मंदिरामध्ये आयोजित या शिबिराच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठ विधी विभागप्रमुख डॉ. विवेक धुपदाळे होते. उपसरपंच प्रवीण तेली, प्रकाश पाटील, गणपतराव पाटील, अंतू तेली, दत्तात्रय पाटील, ॲड. प्रमोद दाभाडे, ॲड. जयदीप कदम, ॲड. संतोष शेलार, अमोल केरले यांची या कार्यशाळेत प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य, दारूबंदी, सायबर क्राईम, महिला सक्षमीकरण आणि कायदेशीर हक्क, बालकांचे हक्क, जमिनीचे हक्क आणि जमिनीवरील वाद, मोफत विधी साहाय्य याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विधी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सायबर क्राईम, घरेलू अत्याचार, दारूबंदी यावर आधारित पथनाट्य सादरीकरण केले. यावेळी ॲड.गौरी सबनीस, ॲड. सुवर्णा कांबळे, रूपाली सरगर, सागर कांबळे, अक्षय कोल्हापुरे, ॲड. प्रतीक्षा राजहंस, ॲड. शिवानी, पूजा लोहार, वैष्णवी माळी, किरण कांबळे, सूरज पोळ यांच्यासह विद्यार्थी, परिसरातील नागरिक आदी उपस्थित होते.
