पंढरपूर / प्रतिनिधी
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जलद व सुलभ दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समिती मार्फत टोकन दर्शन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सदर प्रणालीचा प्रथम चाचणीचा शुभारंभ शनिवार, ता. १५ रोजी करण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
या टोकन दर्शन प्रणालीचा शुभारंभ गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते व सदस्य महोदयांच्या उपस्थित संपन्न झाला. हा कार्यक्रम श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप, पंढरपूर येथे सकाळी संपन्न झाला. यावेळी मंदिर समितीचे सदस्य शकुंतलाताई नडगिरे, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, अॅड. माधवीताई निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसिलदार सचिन लंगुटे, नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे, पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत, बलभिम पावले, संजय कोकीळ, राजाराम ढगे, उपस्थित होते.

