कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाड येथे कृष्णा नदी तीरावर भरणाऱ्या कृष्णा-वेणी यात्रेसाठी शेती १५ दिवसांसाठी राखीव ठेवण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा काही शेतकऱ्यांनी शेती देण्यास मज्जाव केला आहे. या निषेधार्थ शुक्रवारी सर्वपक्षीय कृती समितीने शहर बंदची हाक दिली आहे.
कृती समितीचे प्रफुल्ल पाटील, वैभव उगळे, बाबासाहेब सावगावे, तानाजी आलासे, सुनील कुरुंदवाडे,
संजय डोंगरे, सोमेश गवळी, अविनाश गुदले यांनी माहिती दिली आहे. आठ दिवस अगोदर यात्रा कमिटीने ताब्यात घेतलेली शेती यात्रेनंतर शेतकऱ्यांना परत केली जाते. पालिकेने तीन वेळा नोटीस देऊनही जागा देण्यास मज्जाव केला आहे. वरिष्ठांना निवेदन दिले असून प्रशासनाने लवकर निर्णय न घेतल्यास बेमुदत शहर बंद करण्याचा इशारा दिला आहे. पत्रकावर दयानंद मालवेकर, माजी नगरसेवक राजू आवळे आदींच्या सह्या आहेत.
