राज्य बेसबॉल लिटल लीग स्पर्धेत कोल्हापूर उपविजेते

कोल्हापूर / प्रतिनिधी

दहिवडी (सातारा) येथे झालेल्या सातव्या राज्यस्तरीय बेसबॉल लिटल लीग स्पर्धेत महाराष्ट्रातील १६ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुणे संघाने कोल्हापूर संघावर मात केली. यामुळे कोल्हापूरला उपविजेतेपद मिळाले.
स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात कोल्हापूरने सातारा संघाचा १०-३ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. कोल्हापूर जिल्हा संघामध्ये शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलचे खेळाडू जय कुंभार, समर्थ जाधव, विनीत चौगुले, दीपक दाखवे, राधेय घाटगे, मयूर अस्वले, श्रेयश माने, स्वराज सागर, चिन्मय चोकाकर, आदिती पुरेकर, सिद्धी वडर, उन्नती पाटील यांचा समावेश होता.
सर्वांना मुख्याध्यापिका सौ. वृषाली कुलकर्णी, उपमुख्याध्यापक पी. आर. मोरे, प्रवेक्षक एस. पी. पाटील, ज्येष्ठ शिक्षक राजेश वरक, अनिल चव्हाण, क्रीडा शिक्षिका सौ. इंद्रायणी पाटील, देविदास महाले, राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. राजेंद्र बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Scroll to Top