राज्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामध्ये कोल्हापूर प्रथम

कोल्हापूर / प्रतिनिधी

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याचा जागतिक आरोग्य दिनी मुंबईत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम झाला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी पर्यवेक्षक प्रज्ञा संकपाळ यांनी हा सन्मान स्वीकारला.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत पथकांनी अंगणवाडी आणि शाळांमधून मुलामुलींची मोफत तपासणी करून आवश्यक बालकांवर मोफत औषधोपचार, शस्त्रक्रिया करून राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., डॉ. सरिता थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

Scroll to Top