कोल्हापूर बास्केटबॉल प्रीमियर लीग आजपासून

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर बास्केटबॉल प्रीमियर लीग (केबीपीएल) सिझन ५ स्पर्धेला कोल्हापुरात दिमाखात प्रारंभ होत आहे. शनिवार, दि. १० मे रोजी शहाजी लॉ कॉलेज मैदानावर स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यंदाच्या लीगमध्ये एकूण १०० पेक्षा अधिक राष्ट्रीय, विद्यापीठ व राज्य पातळीवरील नामांकित खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत आणि कॉन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी फिबाच्या टेक्निकल डेलिगेट स्नेहल बेंडके, जिल्हा बास्केटबॉलचे उपाध्यक्ष नितीन दलवाई, वीज वितरण नियंत्रण समितीचे अमर समर्थ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती अध्यक्ष मानसिंग पाटील, प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील, उपप्राचार्य डॉ. सुरेश फराकटे, उद्योजक उर्जित पाटील यांनी दिली आहे.

Scroll to Top