केएलई राज्यात दर्जेदार शिक्षण देणारी अव्वल संस्था : प्राचार्य पाटील

निपाणी / प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूरच राहिले पाहिजे. ११ वी व १२ वी ही दोन वर्षे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. आगामी सहा वर्षे विद्यार्जनासाठी जिद्द, चिकाटीने संघर्ष करा. यामध्ये जो यशस्वी होतो. त्याला जगातील सर्व क्षेत्रांची कवाडे खुली होतात. लोकसेवा, शासकीय, खाजगी क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात अनेक संध्या या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळू शकतात.
सायन्स च्या विद्यार्थ्यांनाही विविध विभागांच्या अत्युच्च अभियांत्रिकी, संशोधन क्षेत्रात अनेक कोर्सेसची उपलब्धता आहे. केएलई राज्यात दर्जेदार शिक्षण देणारी अव्वल संस्था असल्याचे प्रतिपादन प्राचार्य एस.एफ. पाटील यांनी केले.
येथील अग्रगण्य केएलई संचलित जी.आय. बागेवाडी महाविद्यालयातर्फे आशिर्वाद सांस्कृतिक भवन येथे चालू आर्थिक वर्षातील नवागत विद्यार्थी परिचय कार्यक्रम ज्ञान प्रकाशउत्साहात झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य एम.एम. हुरळी होते.
प्राचार्या एच.डी. चिकमठ म्हणाल्या, उज्ज्वल इतिहासाचा वारसा पुढे नेत डॉ. प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली केएलईच्या माध्यमातून हजारो कर्तबगार विद्यार्थी घडविण्याचे काम अविरतपणे सुरू आहे. मुलांचे भवितव्य चांगले घडविण्यासाठी पीयुसी अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. सर्व अभ्यासक्रम कॉलेजमध्येच उपलब्ध करून दिला जाईल. विद्यार्थ्यांसाठी सीईटी, नीट, जेईई, सीए फाऊंडेशन क्लासेसची सुरवात करण्यात आली आहे.
यावेळी इयत्ता १२ वीत प्रथम आलेल्या आणि विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या होतकरू विद्यार्थ्यांसह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्रेयस घाटगे (शिपूर ता. हुक्केरी) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महेश बागेवाडी, जयश्री टिके, अथर्व दुमाले, साक्षी यादव यांच्यासह पीयुसी कला, वाणिज्य, विज्ञान विभागाचे विद्यार्थी व पालक उपस्थित होते. आभार अश्विनी किल्लेदार यांनी मानले.

Scroll to Top