‘केडीसीए’तर्फे १५ वर्षांखालील महिला खेळाडूंना आवाहन

कोल्हापूर / प्रतिनिधी

जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (केडीसीए) वतीने सन २०२५-२६ हंगामासाठी १५ वर्षांखालील महिला क्रिकेट खेळाडूंसाठी मुंबईच्या माजी महिला रणजी खेळाडू अभया नाईक-साठम यांच्या मार्गदर्शनाचा एक महिन्याचा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. दि. १ सप्टेंबर २०११ नंतर जन्मलेल्या महिला खेळाडूंना यात सहभागी होता येईल. इच्छुकांनी आधार कार्ड व जन्म दाखला झेरॉक्स प्रतीसह ‘केडीसीए’च्या छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सचिव शीतल भोसले यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Scroll to Top