“कार्तिक स्वामी”
कार्तिक स्वामी हे भगवान शिव व महाभगवती पार्वती यांचे पुत्र.कार्तिकस्वामींचे दक्षिणेतील नाव मुरूगन स्वामी.मुरूगन म्हणजे ज्याचे मुख अत्यंत सुंदर आहे तो . कार्तिक स्वामी हे देवांचे सेनापती आहेत. हे सर्व देवांचे प्रमुख रूप आहे. मौन धारण करून अतर्क्य कामे करणे हा त्यांचा पिंड आहे . त्रिपुरी पौर्णिमा अर्थात कार्तिक पौर्णिमा , कार्तिकात कृत्रिका नक्षत्रावर कार्तिकस्वामींचा जन्म झाला होता.महाराष्ट्रात त्यांना कार्तिकस्वामी,सहा तोंडे असल्याने षन्मुखानंद व कर्नाटकात षडानन म्हणून ओळखले जाते.कार्तिकस्वामींचे लग्न झालेले असून त्यांना दोन पत्नी आहेत.एकीचे नाव वल्ली तर दुसरीचे नाव देवयानी आहे .
स्वामींच्या उजव्या हातात वरद्करम् , कमळ , घंटा , माळा , दंड , आयुध व धनुष्य आहे म्हणून त्यांना दंडायुधपानीही म्हणतात.कार्तिक स्वामी जन्मत:चं अतिहुशार अतिचिकित्सक होते .एकदा त्यांनी ब्रह्मदेवास ओमचा अर्थ विचारला असता ब्रह्मदेवाने त्यांना १२ हजार श्लोकांत अर्थ सांगितला . त्यावेळी कार्तिकस्वामींनी तात्काळ ब्रह्मदेवाला ज्ञान कमी आहे , असे सांगत शिवालय गाठले . तेथे कार्तिक स्वामींनी शिवाला १२ कोटी श्लोकात ओमचा अर्थ ऐकविला.त्र्यंबकेश्वरी तीर्थराज कुशावर्तावर दोन ठिकाणी कार्तिकस्वामी मंदिर आहे . नाशिक – त्र्यंबक रोडवर अंजनेरी येथे कार्तिक स्वामींचे प्राचीन दगडी मंदिर आहे . कार्तिक स्वामीचे बंधू गजाननाचे गणपतीचे मंदिर बाजूला आहे .या दोघांचे
माता – पिता शिवपार्वती त्र्यंबकेश्वरी वसलेले आहे .मोराचे पीस , सोन्याचा तुकडा , मंगळाचा खडा असे कमंडलूतून बघितल्यास दारिद्र्य नष्ट होते , अशी भाविकांची भावना आहे.
संपूर्ण भारतामध्ये स्वामींची दुर्मिळ मंदीरे असून कर्नाटकात सांडूर व महाराष्ट्रात पुणे येथे पर्वती , नाशिक ,कोल्हापूर , संगमेश्वर,चिपळूण येथे मंदिरे आहेत.स्त्रीयांनी कार्तिकेयांचे दर्शन घेऊ नये,असे कोणतेही शास्त्र सांगत नाही.परंतु महाराष्ट्रातील स्त्रिया केवळ कार्तिक पौर्णिमेलाच स्वामींचे दर्शन घेतात.दक्षिणेतील स्त्रीया या गोष्टी मानत नाही त्या वर्षभर दर्शन घेतात.
कार्तिकस्वामींच्या हातातील शूळ :
कार्तिकस्वामींची महाराष्ट्रात मोठी पूजा केली जाते कारण महादेवाने त्र्यंबकेश्वरी गोदावरी नदीच्या किनारी त्यांना ‘ शूळशक्ती ‘ प्रदान केली होती . या शक्तीमध्ये पंचमहाभूतांना नष्ट करण्याची ताकद आहे . त्यांच्य हातात जे पिंपळपानासारखे दिसते तिच ही शूळशक्ती होय . कार्तिके यांना बारा हात असून ही मूळ स्वरूपातील मूर्ती केवळ दक्षिणेतच पहायला मिळते .
कार्तिक स्वामींचे वाहन
कार्तिक स्वामींचे वाहन मयूर ( मोर ) आहे . मयूर हा पक्षी वेदस्वरूप मानण्यात येतो .
वेदी एवं मयुर इस्यात प्रणव शणमुघ इस्तदा
याचाच अर्थ ब्रह्मविद्या , शक्ती , मुक्ती , वत्तजनान , स्मिधा हे ॐ कार स्वरूप मयूराचे वर्णन आहे . स्कंद दर्शनात तर मयूर मुक्ती देणारा म्हणून सर्वश्रृत आहे .
कार्तिक स्वामींची भारतातील वास्तव्य स्थाने
पळणी , मद्रास : रवाणपद्यम
पाळमुदीर शौळे : शाकदम्
तिरूपुरम् गुंद्रम : सौरम्
तिरतणी : शैवम्
तिरूचेंदूर : वैष्णवम्
स्वामीमलय : कौमारम्
वरील माहिती आमच्या वाचनात आली असून आम्ही याच्याशी सहमत आहोतच असे नाही .