८ जून दिनविशेष २०२५
१६७०: पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला.
१६२४: पेरू येथे भूकंप.
१७०७: औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशाहला ठार करुन दिल्लीची गादी बळकावली.
१७१३: मुघलांनी १६८९ मधे जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी यांनी सिद्दीकडुन राजकारणाने जिंकुन घेतला.
१७८३: आईसलँड मधील लाकी ज्वालामुखीचा उद्रेक, हजार ठार.
१९१२: कार्ल लेम्ले यांनी यूनिव्हर्सल पिक्चर्स या कंपनीची स्थापना केली.
१९१५: लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या गीतारहस्य या ग्रंथाचे गायकवाडवाड्यात प्रकाशन झाले.
१९१८: नोव्हा अॅक्विला या सर्वाधिक तेजस्वी तेजोमेघाचा शोध.
१९४१: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सीरीया व लेबानॉन पादाक्रांत केले.
१९४८: एअर इंडिया ची मुंबई – लंडन विमानसेवा सुरू झाली.
१९४८: जॉर्ज ऑर्वेलची १९८४ या नावाची कांदबरी प्रसिद्ध झाली.
१९५३: कृष्णवर्णीयांना हॉटेलमधे सेवा नाकारण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली.
१९६९: लष्करप्रमुख म्हणून सॅम माणेकशा यांची नियुक्ती.
१९९२: पहिल्यांदा जागतिक महासागर दिन साजरा केला गेला.
२००४: आधुनिक काळातील शुक्राचे (सूर्यावरुन) पहिले अधिक्रमण झाले. याआधीचे अधिक्रमण १८८२ या वर्षी झाले होते.
२०२२: मिताली राज – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त रनस् करणाऱ्या दिग्गज भारतीय क्रिकेटपटू यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
२०२२: युरोपियन संसदेने २०३५ पर्यंत इंधनावर चालणाऱ्या वाहनांची विक्री बंद करण्यास मत दिले.
१९८७: न्यूझीलंड न्यूक्लियर फ्री झोन – न्यूझीलंडच्या सरकारने, निःशस्त्रीकरण आणि शस्त्रास्त्र नियंत्रण कायदा १९८७ अंतर्गत राष्ट्रीय आण्विक मुक्त क्षेत्र स्थापन केले.
१९५३: एफ-५ चक्रीवादळ – अमेरिकेतील मिशिग मध्ये झालेल्या वादळात ११६ लोकांचे निधन, ८४४ लोक जखमी आणि ३४० घरं उद्ध्वस्त झाली.
१९४२: दुसरे महायुद्ध – इंपीरियल जपानी नौदलाने सिडनी आणि न्यूकॅसल या ऑस्ट्रेलियन शहरांवर हल्ला केला.
१९४०: दुसरे महायुद्ध – ऑपरेशन अल्फाबेट: नार्विक देशामधून मित्र राष्ट्रांना बाहेर काढले.
१९२९: मार्गारेट बॉन्डफिल्ड – युनायटेड किंगडमच्या मंत्रिमंडळात पहिल्या महिला मंत्री बनल्या.
१९०६: भारतीय क्रिकेट खेळाडू सैयद नझीर अली यांचा जन्म.
१९१०: लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९७३)
१९१५: भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी काययार सिंहनाथ राय यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट २०१५)
१९१७: भावगीत गायक गजाननराव वाटवे यांचा जन्म. (मृत्यू: २ एप्रिल २००९)
१९२१: इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी २००८)
१९२५: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांची पत्नी बार्बरा बुश यांचा जन्म.
१९३२: इंग्लिश क्रिकेटपटू रे इलिंगवर्थ यांचा जन्म.
१९३६: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भैतिकशास्त्रज्ञ केनिथ गेडीज विल्सन यांचा जन्म.
१९५५: वर्ल्ड वाईड वेब चे जनक टिम बर्नर्स-ली यांचा जन्म.
१९५७: चित्रपट अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा जन्म.
१९७५: भारतीय अभिनेत्री आणि निर्माता शिल्पा शेट्टी यांचा जन्म.
१९३०: भारतीय पत्रकार, लेखक, आणि शैक्षणिक एम. एन. विजयन यांचा जन्म (मृत्यू : ३ ऑक्टोबर २००७)
१६१२: किंईग चीनी जनरल वु सांगूइ यांचा जन्म (मृत्यू : २ ऑक्टोबर १६७८)
६३२: ६३२ई.पुर्व : इस्लाम धर्माचे संस्थापक मोहंमद पैगंबर यांचे निधन.
१७९५: फ्रान्सचा राजा लुई १७ वा यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १७८५)
१८०९: अमेरिकन विचारवंत राजकारणी थॉमस पेन यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १७३७)
१८४५: अमेरिकेचे ७वे राष्ट्राध्यक्ष अॅन्ड्रयू जॅक्सन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १७६७)
१९९५: रंगभूमी कलावंत एकपात्री प्रयोगकार राम नगरकर यांचे निधन.
१९९८: नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष सानी अबाचा यांचे निधन.
२०२२: भारतीय लिंबू भाषेतील लेखक – पद्मश्री बिरखा बहादूर मुरिंगला यांचे निधन (जन्म: १३ एप्रिल १९४३)
१८६५: इंग्रजी माळी आणि वास्तुविशारद, क्रिस्टल पॅलेसचे रचनाकार जोसेफ पॅक्सटन यांचे निधन (जन्म: ३ ऑगस्ट १८०३)

