लेकासाठी जयवंतराव आवळे पुन्हा मैदानात

मागील अनेक वर्षापासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार तथा माजी मंत्री जयवंतराव आवळे राजकारणापासून अलिप्त होते. जयवंतराव आवळे यांनी राजकारणातील लक्ष कमी केले होते. चालू असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये लेकासाठी जयवंतराव आवळे यांनी प्रचारामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.
राजू आवळे यांना दुसऱ्यांदा आमदार करण्यासाठी आपल्या अनुभवाच्या जोरावर जयवंतराव आवळे मतदारसंघ पिंजून काढत आहे. आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. प्रचार यंत्रणेमध्ये जयवंतरावांनी पुन्हा सक्रिय सहभाग घेतल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्यातून आनंद व्यक्त होत आहे.

Scroll to Top