वैभव मांगले यांना जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार जाहीर

नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या नावे देण्यात येणारा ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार’ रंगकर्मी वैभव मांगले यांना जाहीर झाला आहे. दि. 6 मार्च रोजी सायं.5.00 वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

मांगले यांनी सिनेमा, नाटक, मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. ‘मुक्काम पोष्ट बोंबिलवाडी, टाईमपास, नवरा माझा नवसाचा, नवरा माझा नवसाचा 2, दुनियादारी, फुलवंती’ अशा चित्रपटांतून तसेच विविध मालिकांतून घरोघरी पोहोेचले आहेत. ‘अलबत्या गलबत्या, वाडा चिरेबंदी, व्यक्ती आणि वल्ली, वासूची सासू, संज्याछाया, मर्डरवाले कुलकर्णी’ अशा सध्याच्या नाटकातून ते रसिकांचे लाडके अभिनेते म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Scroll to Top