इचलकरंजी/ प्रतिनिधी
५७ व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी कोल्हापूर खो खो असोसिएशनतर्फे हातकणंगले येथे आयोजित राज्यस्तरीय खो खो अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेत जयहिंद मंडळ पुरुष संघाने प्रथम क्रमांक पटकावला. संघातील सहभागी खेळाडूंनी स्पर्धेत उत्कृष्ट खेळी करुन अंतिम फेरीत प्रवेश करीत सीआरएसएसयु संघावर मात करुन प्रथम क्रमांक मिळवला.
अर्णव पाटणकर यास सर्वोत्कृष्ट खेळाडू व आदित्य कांबळे याला उत्कृष्ट आक्रमक म्हणून पुरस्कार मिळाला. ५७ व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धा ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२५ अखेर पुरी (ओडिशा) येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी कोल्हापूर संघाची निवड होणार आहे. त्याबद्दल जयहिंद मंडळाचे अध्यक्ष सतीश डाळ्या, कार्याध्यक्ष उदय चव्हाण, कार्यवाह दिलीप ढोकळे यांनी संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.

