‘अॅस्टर’मध्ये आय.व्ही.एफ. विभाग सुरू

कोल्हापूर / प्रतिनिधी

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये वंध्यत्व निवारणासाठी आय.व्ही.एफ. (टेस्ट ट्यूब बेबी) विभाग सुरू करण्यात आला. या विभागात स्त्री व पुरुषांची वंध्यत्वविषयक सखोल तपासणी, योग्य उपचारपद्धती व समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
टेस्ट ट्यूब बेबी तज्ज्ञ डॉ. नंदिता परांजपे जोशी या विभागात कार्यरत असतील, तसेच डॉ. मिलिंद तिवले, डॉ. शिल्पा जोशी, डॉ. गौरी केणी आणि डॉ. उल्हास दामले यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची टीम देखील उपलब्ध असेल. वंध्यत्व निवारणापासून ते बाळ जन्माला येईपर्यंत संपूर्ण उपचार येथे एकाच छताखाली दिले जाणार आहेत. तसेच, बालरोग तज्ज्ञ व नवजात शिशु विभागही कार्यरत आहे. अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये प्रगत तंत्रज्ञानासह सर्वसामान्य कुटुंबांसाठीही उपचार उपलब्ध असल्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उल्हास दामले यांनी सांगितले.

Scroll to Top