नंदादीप नेत्रालयात जागतिक महिला दिन उत्साहात

कोल्हापूर / प्रतिनिधी

नंदादीप नेत्रालय कोल्हापूरतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त निराधारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर व विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी आदर्श महिलांचा सन्मान, एकटी व निवारा संस्थेतील महिलांसाठी कार्यक्रम आणि महिलांसाठी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके घेण्यात आली.
कार्यक्रमात डॉ. स्नेहा शिंदे, डॉ. ऋचा पाटील, ऑलिंपिक पदक विजेते स्वप्निल कुसाळे यांचे वडील सुरेश कुसाळे, स्वाती शाह उपस्थित होते. आशा वर्करचा डान्स, कला मंचची मैफिल, अवयवदान विषयावर नाटक व शिवकालीन खेळ झाले. संपूर्ण मार्च महिन्यात महिलांसाठी मोफत तपासणी करण्यात येणार असल्याचे रुग्णालयातर्फे कळवले आहे.

Scroll to Top