इचलकरंजी / प्रतिनिधी
डीकेटीई सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक मध्ये कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या कौशल्य विकास केंद्रासाठी ७० लाख इतकी गुंतवणूक करण्यात आली आहे. या अत्याधुनिक सुविधेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना अचूक मशिनिंग व आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानात प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि कौशल्य प्रदान करणे आहे.
हे कौशल्य विकास केंद्र विद्यार्थ्यांना नवीनतम सीएनसी आणि व्हीएमसी मशीनिंग तंत्रांनी सक्षम करेल. ज्यामुळे ते उद्योगासाठी सज्ज असतील आणि आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत आवश्यक असलेल्या कौशल्याने सुसज्ज असतील, असे संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले. कौशल्य विकास केंद्राच्या उभारणीसाठी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, विश्वस्त अनिल कुडचे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य, प्रा.ए.पी.कोथळी, उपप्राचार्य प्रा.बी.ए.टारे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे. या उद्घाटनप्रसंगी मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक, प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सदरच्या केंद्राचे इन्चार्ज म्हणून प्रा.ए.आर. सावळवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

