शिराळा / प्रतिनिधी
शिराळा आगारास मिळालेल्या नवीन अत्याधुनिक बस चा लोकार्पण सोहळा गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर झाला. यावेळी आमदार सत्यजित देशमुख, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार सदाभाऊ खोत, सम्राट महाडिक, संपतराव देशमुख, अॅड भगतसिंग नाईक, रणजितसिंह नाईक, चेतन हसबनीस, सुनील भोकरे उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, आत्ता दहा बस आल्याने वाहतुकीचे नियोजन योग्य करणे गरजेचे आहे. एस टी चे चालक वाहक खुष असतील तर एस टी ची भरभराट नक्कीचं होईल. त्यासाठी त्यांच्यावर होणाऱ्या दंडात्मक कारवाया कशा टाळता येतील ते पहा. गुजरात स्टेट ट्रान्सपोर्ट भारतात नंबर वन आहे. त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न व्हावा. आगारात शुद्ध पाण्याचा तुटवडा आहे त्यासाठी एप्रिल अखेर आरओ मशीन आगारात बसवले जाईल. या एस टी साठी जीवाचे रान केले. त्यासाठी एस टी च्या अधिकाऱ्यांनी चांगले भारमान येण्यासाठी प्रयत्न करावा. आम. सदाभाऊ खोत म्हणाले, एस टी च्या उन्नतीसाठी आम्हीं राज्यभर आंदोलन उभे केले. आज पर्यंत झाली नाही तेवढी पगारवाढ कर्मचाऱ्यांना देऊ केली. एस टी मध्ये टायर पासून नट बोल्ट पर्यंत भ्रष्टाचार अधिकाऱ्यांच्या संगनमताने होत आहे तो रोखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. चालक वाहक ही खरी एसटी ची चाके आहेत त्यांना कधी अधिकाऱ्यांनी दुखवू नये.
माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले, रस्ता तिथे एस टी हे ब्रीदवाक्य घेवून एस टी चे कार्य सुरू आहे. सर्वसामान्यांना फक्त एस टी चा आधार आहे. त्यांना चांगली व गतिमान सेवा कशी देता येईल हे अधिकाऱ्यांनी पाहावे. सम्राट महाडिक म्हणाले, विद्यार्थ्यांना अधिक मोफत सेवा कशी देता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एस टी ची नाळ ही ग्रामीण भागाशी जुळली आहे त्यासाठी तिला नवसंजीवनी देणे गरजेचे आहे. कार्यक्र मास जयसिंगराव शिंदे, सुखदेव पाटील, संपतराव देशमुख, हणमंतराव पाटील, केदार नलवडे, के.डी. पाटील, चेतन हसबनीस, वैभवी कुलकर्णी, अनिता धस, योगिता माने, शैलेश माने, पृथ्वीसिंग नाईक, सम्राट शिंदे आदी उपस्थित होते.

