कुंभोज/प्रतिनिधी

कुंभोज ता. हातकणंगले येथे नविद मुश्रीफ विचारमंच शाखेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नविद मुश्रीफ विचार मंच चे संस्थापक संदेश भोसले म्हणाले, निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येतो. प्रेमाचे वारे फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीपासूनच वाहतात. यामध्ये खास दिवस ठरतो तो १४ फेब्रुवारी. त्याचेच औचित्य साधत नविद मुश्रीफ यांच्यावर आम्ही मनापासून प्रेम करतो आणि त्यांचेही आमच्यावर प्रेम, आपुलकी, विश्वास असलेने त्यांनी कुंभोज गावच्या विकासकामांसाठी आमच्या मागणीवरून आजपर्यंत भरपूर निधी दिला. तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून परिसरातील कित्येक रुग्णांचे मोफत ऑपरेशन सुद्धा करण्यात आले.आणि यापुढेही आम्ही गोरगरिबांची निस्वार्थ सेवावृत्तीने कामे करणार आहोत. त्याचबरोबर हातकणंगले तालुक्यात मुश्रीफ गट वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे संदेश भोसले म्हणाले.
सदर नविद मुश्रीफ विचार मंच या शाखेची नवनियुक्त पदाधिकारी कार्यकारिणी पुढील प्रमाणे – अध्यक्ष उदय भोसले, उपाध्यक्ष सागर भोरे, सचिव सुरज पालखे, सह. सचिव पिराजी कोळी, खजिनदार संग्राम चव्हाण यांची निवड करण्यात आली..
उद्घाटन प्रसंगी लखन भोसले, संदीप तोरस्कर, विजय नामे, सुदेश नाडे, लक्ष्मण चंदरगी, सागर डोणे, राहुल कडकलक्ष्मी, संभाजी कोठावळे, दीपक घोदे, राजू मुजावर, सुशांत कोले, रत्नदीप डोणे, राणोजी डोणे, सतीश कांबळे, राजू कांबळे, शुभम कांबळे, हणमंत मिसाळ, प्रशांत पवार, प्रणव चव्हाण, राजू खोंद्रे, रमेश भोसले, संदीप माने, अजय नामे, वृषभ भोकरे तसेच गावातील जेष्ठ नागरिक ,मुश्रीफ प्रेमी युवावर्ग विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक उपस्थित आदी होते.
