आलासे अर्बन बँकेच्या २२ व्या माधवनगर शाखेचे उद्घाटन

कुरुंदवाड / प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील माधवनगर (ता. मिरज) येथे स्वा. सै. कै. श्रीपाल काका आलासे कुरुंदवाड अर्बन बँकेच्या २२ व्या शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
आदिनाथ पतसंस्थेचे चेअरमन पोपटराव डोर्ले-यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी माधवनगरच्या सरपंच अंजू शेखर तोरो होत्या. चेअरमन प्रदीप पाटील, संचालक इकबाल पटवेगार यांची प्रमुख उपस्थिती होती. कै. श्रीपाल काका आलासे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून फीत कापून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आदिनाथचे चेअरमन डोर्ले म्हणाले, कुरुंदवाड अर्बन बँकेने सातत्याने प्रगतीचा आणि विश्वासाचा आदर्श ठेवला आहे. बँकेचा पारदर्शक कारभार, शिस्तबद्ध सेवा आणि ग्राहकांशी असलेले प्रामाणिक नाते ही तिची खरी ताकद आहे. ग्रामीण व शहरी भागात आर्थिक सक्षमतेसाठी बँकेचे योगदान लक्षणीय आहे. सामाजिक बांधिलकी जपत ही बँक नवा आदर्श निर्माण करत असल्याचे सांगितले. चेअरमन पाटील म्हणाले, अर्बन बँकेने विश्वास आणि गुणवत्तेच्या बळावर आजवरचा प्रवास घडवला आहे. माधवनगर येथील शाखा ही फक्त एक विस्तार नाही, तर सेवा आणि विकासाचा नवा टप्पा आहे. ही वाटचाल विश्वासाने पुढे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन अजिंक्य चव्हाण यांनी केले. आभार बँकेचे ज्येष्ठ संचालक महादेव धनवडे यांनी मानले. या उद्घाटन सोहळ्यासाठी बँकेचे माझी चेअरमन अरुण आलासे, मोन्नाप्पा चौगुले, ग्रा. पं. सदस्य, ठेवीदार, नागरिक उपस्थित होते.

Scroll to Top