राष्ट्रभक्तीपर समूहगीत स्पर्धेत डॉ. मैत्रिणी ग्रुप प्रथम

कोल्हापूर / प्रतिनिधी

करवीर नगर वाचन मंदिरतर्फे आयोजित केलेल्या राष्ट्रभक्तीपर समूहगीत स्पर्धा संस्थेच्या सभागृहामध्ये नुकतीच झाली. यामध्ये डॉ. मैत्रिणी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. परीक्षक म्हणून राजेंद्र मेस्त्री व डॉ. नीला नागावकर यांनी काम पाहिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी, कार्यवाह डॉ. आशुतोष देशपांडे, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकृष्ण साळोखे आदी उपस्थित होते.
संचालिका माहेश्वरी गोखले यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचा परिचय कार्यवाह डॉ. आशुतोष देशपांडे यांनी करून दिला. या स्पर्धेस रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक (डॉ. मैत्रिणी ग्रुप) : सहभाग : डॉ. माधुरी कुलकर्णी, डॉ. माया सांगवडेकर, डॉ. अमिता हर्षे, प्रतिभा पिशवीकर, रजनी मोहिते, मनीषा घोरपडे, संगीता करोषे, दीपाली शिंदे.
द्वितीय क्रमांक (गाणी मनातील ग्रुप) सहभाग अरुणा पालणकर, मनीषा गद्रे, वैष्णवी पायमल, मनीषा कईंगडे, डॉ. पल्लवी मोरे, अजित नरके, शरद जोशी, श्रीया जोशी.
तृतीय क्रमांक (सारंग सुगम संगत विद्यालय) शीतल गिरीश आरेकर, निशा नितीन कुलकर्णी, मीना द्रोणाचार्य पाटील, शैलजा सदानंद पाटील, सुप्रिती शशांक काकडे, सुप्रिया सूरज कारेकर, सारिका धीरज रणदिवे, सपना व्यंकटेश देशपांडे. प्रोत्साहनपर बक्षिसे अलंकार कला अॅकॅडमी (इयत्ता ५ वी ते ८ वी)

प्रोत्साहन बक्षीस : रसिकरंजन ग्रुप (९ वी ते १२ वी).

Scroll to Top