तारदाळ परिसरात म. बसवेश्वर महाराज जयंती उत्साहात साजरी

तारदाळ / प्रतिनिधी

तारदाळ परिसरात बुधवारी महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात भक्तीमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
श्री बसवेश्वर जयंती उत्सव कमिटी तारदाळ यांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य स्वामी (बेळंकी) यांचे प्रवचन झाले. बुधवारी पहाटे श्री क्षेत्र अल्लमप्रभू येथून ज्योत आणण्यात आली. तसेच जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दुपारी १२ वा. ३६ मिनिटांनी श्रींच्यावर पुष्पवृष्टी करीत बसवेश्वरांची मूर्ती पाळण्यात ठेवून पारंपरिक पाळणा गीत गायले गेले. त्यानंतर श्रींची महाआरती करण्यात आली. उत्सवास ज्ञानेश्वर भजनी मंडळ, दत्त भजनी मंडळ, व अवधुत भजनी मंडळ यांचे सहकार्य लाभले. सायंकाळी श्रींच्या मिरवणुकीचे आयोजन देखील करण्यात आले होते.

Scroll to Top