कोल्हापूर / प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र
शासनाने रिक्षा भाडेवाड लागू करूनही अद्याप शहरात लागू केलेली नाही. तरी रिक्षाचालकांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन ही भाडेवाढ तत्काळ लागू करा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस आय रिक्षा संघटनेच्या वतीने करण्यात आली. हे निवेदन जिल्हाध्यक्ष राहुल पोवार यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. जिल्ह्यातील रिक्षा व्यवसाय प्रचंड अडचणीत आला आहे. प्रचंड वाढलेली महागाई, रिक्षाच्या स्पेअर पार्टस्ची वाढलेली किंमत, त्यामुळे शहरातील रिक्षाचालकांना प्रचंड प्रमाणात अडचणीस सामोरे जावे लागत आहे. तरी रिक्षाचालकांना भाडेवाढ लागू करावी. कल्याणकारी महामंडळाची स्थापना केली असून, त्याचे अनुदान सुरू करावे. या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. यावेळी उदय कदम, तानाजी क्षीरसागर, अमोल जाधव, रियाज जेनापुरे, अक्षय पोवार, आकाश नाईक, कृष्णा बनसोडे, संजय घोडके, दत्ता कांबळे आदी उपस्थित होते.
